Anushka Tapshalkar
चणे हे प्रथिने, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेले सुपरफूड आहेत. पण आरोग्यासाठी उकडलेले चणे जास्त फायदेशीर की भाजलेले? जाणून घ्या दोन्हींपैकी तुमच्यासाठी कोणता पर्याय अधिक योग्य आहे.
Cooked VS Roasted Chana Which is Best for Health
sakal
चणे हे प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. ते शरीराला ऊर्जा देण्यास आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास मदत करतात.
Why Eat Chana
sakal
उकडलेले चणे मऊ असल्यामुळे सहज पचतात. फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पचन सुधारते आणि शरीराला हायड्रेशनही मिळते.
Boiled Chana
sakal
भाजलेले चणे कमी कॅलरीचे आणि प्रथिनांनी भरपूर असतात. ऑफिस, प्रवास किंवा मधल्या वेळच्या भुकेसाठी हा एक पौष्टिक पर्याय आहे.
Roasted Chana
Sakal
दोन्ही प्रकारचे चणे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. नियमित सेवन केल्यास स्नायू मजबूत होण्यास, स्टॅमिना वाढण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
Stamina
sakal
पचनाच्या तक्रारी असल्यास – उकडलेले चणे
वजन नियंत्रण आणि झटपट स्नॅकसाठी – भाजलेले चणे
व्यायामानंतर – उकडलेले किंवा भाजलेले दोन्ही चालतील.
Which to Eat
sakal
एकच पर्याय सर्वोत्तम नाही! पचनासाठी उकडलेले चणे, तर कमी कॅलरी आणि सोयीस्कर स्नॅकसाठी भाजलेले चणे अधिक फायदेशीर ठरतात. तुमच्या गरजेनुसार दोन्हींचा आहारात समावेश करा.
Conclusion
sakal
Ajwain
sakal