Aarti Badade
दूध जास्त आचेवर उकळल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात.
प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स वेगळे होऊन दूधाचे पोषण कमी होते.
दूध सतत जास्त आचेवर ठेवले तर ते दही होण्याची शक्यता असते.
अशा प्रकारचे दूध पचायला अवघड होऊन पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
दूध चुकीच्या पद्धतीने उकळल्यास दीर्घकाळ वापरल्यावर शरीरात ऍलर्जी होऊ शकते.
दूध मध्यम किंवा मंद आचेवर उकळा. त्यामुळे पोषण टिकते आणि आरोग्यास फायदेशीर ठरते.
दूध उकळताना थोडी उकळी आल्यावरच गॅस बंद करा, दीर्घ वेळ शिजवू नका.