Apurva Kulkarni
आमीर खान सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या ट्रेलरवर ट्रोल होतोय. त्याचा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'चॅम्पियन'चा रिमेक असल्याचं बोललं जातय.
आमिरचे असे काही चित्रपट आहेत जे हॉलिवूड चित्रपटाचे कॉपीपेस्ट आहेत.
त्यातील एक म्हणजे 'दिल है कि मानता नहीं'.. हा हॉलिवूडच्या 'इट्स हॅपन्ट्स वन नाईट'वर आधारित आहे.
आमिर खानचा 'जो जीता वही सिकंदर' चित्रपट सुद्धा हॉलिवूडच्या 'ब्रेकिंग अवे' चित्रपटाचा रिमेक आहे.
'हम हैं राही प्यार के' सुद्धा 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाऊसबोटचा कॉपी-पेस्ट आहे.
आमिरचा 'आतंक ही आंतक' सुद्धा एका इंग्रजी चित्रपटाचा रिमेक आहे. 1972मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द गॉडफादर'चा कॉपी आहे.
1995 मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजी' चित्रपट सुद्धा 'डाय हार्ड' या हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे.
'अकेले हम अकेले तुम' हा चित्रपट सुद्धा हॉलिवूडच्या 'क्रॅमर vs क्रॅमर' वर आधारित आहे.
आमिरचा 'गुलाम' हा चित्रपट हॉलिवूडच्या 'ऑन द वॉटरफ्रंट' वर आधारित आहे.