Rajpal Yadav Jail : करोडोंची कमाई, सुपरहिट चित्रपट…; अभिनेता राजपाल यादवला 'ती' एक चूक पडली महागात, करिअर झालं उद्ध्वस्त!

बाळकृष्ण मधाळे

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव आज मात्र स्वतःच्या आयुष्यातील कठीण काळामुळे चर्चेत आहे.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

चेक बाऊन्स प्रकरण

चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि तो काही काळ तिहार तुरुंगातही होता.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

प्रेक्षकांची मनं जिंकली

हा तोच अभिनेता आहे ज्याने ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’, ‘चुप चुप के’, ‘भागम भाग’सारख्या सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. मग प्रश्न असा पडतो की, एवढी लोकप्रियता आणि कमाई असूनही त्याच्यावर अशी वेळ का आली?

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

२०१० साली झाली एक चूक

२०१० पर्यंत राजपाल यादवचे करिअर योग्य दिशेने सुरू होते. अभिनयातून चांगली कमाई होत होती. मात्र, याच काळात त्याने अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचा चित्रपट बनवण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत एक प्रकल्प सुरू केला आणि त्यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

ती चूक काय होती?

दुर्दैवाने हा चित्रपट वेळेत पूर्ण झाला नाही आणि बॉक्स ऑफिसवर प्रदर्शितही होऊ शकला नाही. परिणामी, संपूर्ण प्रकल्प अपयशी ठरला. चित्रपट न चालल्याने राजपाल यादव कर्जाची परतफेड करू शकला नाही. हळूहळू कर्जाचे ईएमआय थकू लागले.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

चेक बाऊन्स आणि कायदेशीर अडचणी

कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने दिलेले काही चेक बाऊन्स झाले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. कायदेशीर प्रक्रियेदरम्यान न्यायालयाच्या आदेशांचे पालन न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

न्यायालयाचा कडक निर्णय आणि तुरुंगवास

२०१८ मध्ये न्यायालयाने कडक भूमिका घेत राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. बॉलिवूडसाठी ही बातमी धक्कादायक होती. आयुष्यभर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा कलाकार स्वतः मात्र वेदनांमधून जात होता.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

जामीन मिळाला, पण करिअरला मोठा फटका

नंतर राजपाल यादवला जामीन मंजूर झाला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा त्याच्या कारकिर्दीवर आणि मानसिक स्थितीवर खोल परिणाम झाला. अनेक चित्रपट प्रकल्प त्याच्या हातातून निसटले. आर्थिक अडचणी आणखी वाढल्या. सुरुवातीला घेतलेले कर्ज ५ कोटींवरून ९ कोटी रुपयांपर्यंत वाढले.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

राजपाल यादवची भावनिक प्रतिक्रिया

एका सुनावणीदरम्यान राजपाल यादव म्हणाला, “माझ्याकडे पैसे नाहीत. मी काय करावे? ते कुठून आणू? माझे कोणतेही मित्र नाहीत.”

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

सोनू सूद ठरला आधार

या कठीण काळात अभिनेता सोनू सूद राजपाल यादवच्या मदतीला धावून आला. त्याने त्याला आपल्या चित्रपटात भूमिका दिली आणि ५ कोटी रुपयांची साइनिंग रक्कम देत आर्थिक आधार दिला.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

यश, अपयश आणि आयुष्यातील धडा

राजपाल यादवची कहाणी ही यशाच्या शिखरावरून एका चुकीमुळे आयुष्य कसे बदलू शकते, याचे जिवंत उदाहरण आहे. लोकप्रियता, पैसा आणि प्रसिद्धी असूनही योग्य आर्थिक नियोजन नसेल, तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते, याचा हा धडा आहे.

Bollywood Comedian Actor Rajpal Yadav

|

esakal

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याची 'ही' पद्धत ठरू शकते महाग; 99 टक्के लोकांना याची कल्पनाही नाही!

Gold Investment

|

esakal

येथे क्लिक करा...