Mayur Ratnaparkhe
दूरदर्शवरील महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे कॅन्सरने निधन झाले आहे.
राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. घशाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते.
बॉलिवूडचे स्टार ऋषी कपूर यांनाही कर्करोग झाला होता. त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. नंतर २०२० मध्ये त्यांचे रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले.
हिंदी चित्रपटांतील "काका" म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांचे देखील कर्करोगाने निधन झाले. त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला होता.
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनाही कर्करोग झाला होता. त्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. अखेर २७ एप्रिल २०१७ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते फिरोज खान यांनाही कॅन्सरचे निदान झाले होते आणि २७ एप्रिल २००९ रोजी त्यांचे निधन झाले.
इरफान खान यांना २०१८ मध्ये कर्करोगचे निदान झाले होते. ते न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरने ग्रस्त होते. त्यानंतर अखेर २९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.
६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नरगीस दत्त यांनाही कर्करोग झाला होता. त्यांना सायलेंट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते, ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अभिनेते टॉम ऑल्टर यांचे २९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांना त्वचेच्या कर्करोगाने ग्रासले होते.
टेलिव्हिजन अभिनेता विभू राघवचंही कॅन्सरमुळे निधन झालं होतं. तो स्टेज 4 च्या कोलन कॅन्सरनं ग्रस्त होता. अखेर कॅन्सरनं या अभिनेत्याचं आयुष्य हिरावून घेतलं
EOW and ED
ESakal