kimaya narayan
अभिनेता सैफ अली खानमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. सेलिब्रिटी स्वतःच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड्सची नेमणूक करतात. यापैकी अनेकांना किती पगार मिळतो जाणून घेऊया.
शाहरुखच्या बॉडीगार्डचं नाव रवी सिंह आहे. त्याला वार्षिक 2.7 करोड रुपये पगार मिळतो.
अभिनेता सलमानचा सुप्रसिद्ध बॉडीगार्ड शेराला वर्षाचा 2 करोड रुपये पगार आहे. याशिवाय त्याने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचं नाव जितेंद्र शिंदे आहे. त्याचा पगार वार्षिक 1.7 करोड इतका आहे.
अभिनेता हृतिक रोशनच्या बॉडीगार्डचं नाव मयूर शेट्टीगार असं आहे. त्याचा वार्षिक पगार 2.1 करोड रुपये आहे.
अक्षयच्या बॉडीगार्डचा पगार वार्षिक पगार 2.1 करोड रुपये आहे. त्याच नाव श्रेयस असं आहे.
दीपिकाच्या बॉडीगार्डचं नाव जलाल असं आहे. त्याचा पगार वार्षिक 80 लाख ते 1.2 करोड आहे .