kimaya narayan
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने बॉलिवूड हादरलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या शहजादने सैफवर हल्ला केला. त्याने सैफवर चालून 6 वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला.
लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडली. मणका, खांदे आणि हात यावर शस्त्रक्रिया पार पडल्याचं म्हटलं जातंय.
आता लवकरच सैफला डिस्चार्ज मिळणार असल्याची चर्चा होती. काहीजण तर सैफला उद्या 21 जानेवारीला डिस्चार्ज मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.
सैफवर उपचार करणारे डॉक्टर नितीन डांगे यांनी याविषयी महत्त्वाची बातमी शेअर केली. ते म्हणाले कि,"सैफच्या प्रकृतीत सुधार असून येत्या एक-दोन दिवसात त्याला डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल."
सैफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण आहे.