Monika Shinde
बॉलिवूडमध्ये जेव्हा सुपरस्टार्सची गोष्ट होते, तेव्हा सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे तिन्ही नावं हमखास घेतली जातात.
पण अभिनयात यशस्वी असलेले हे तिघे शिक्षणात किती पुढे होते, हे तुम्हाला माहिती आहे का?
चला, पाहूया या तीनही खान्सचा शैक्षणिक प्रवास!
सलमान खान यांनी सुरुवातीचं शिक्षण ग्वालियरमधील सिंधिया स्कूलमध्ये घेतलं. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. मात्र पदवी शिक्षण सोडून अभिनयाकडे वाटचाल केली.
आमिर खान यांचे शालेय शिक्षण मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूल यासारख्या नामांकित शाळांमध्ये झाले. त्यांनी नरसी मोनजी कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते थेट चित्रपटसृष्टीकडे वळले.
शाहरुख खान यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमध्ये झाले. व दिल्ली युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर मास कम्युनिकेशनसाठी मास्टर्ससाठी प्रवेश घेतला, पण शिक्षण पूर्ण होण्याआधीच अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.