Monika Shinde
बॉलीवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतले आहे. काहींनी अमेरिकेत आणि इंग्लंडमध्येही शिक्षण घेतलं आहे. चला, जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल ज्यांनी विदेशात शिक्षण घेतलं.
सैफ अली खान यांच्या पत्नी करीना कपूर यांनी इंग्लंडमधील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मायक्रो कॉम्प्युटरचा तीन महिन्यांचा समर कोर्स केला आहे.
रणबीर कपूर यांनी मुंबईतील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूलमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे.
सैफ अली खान, ज्यांना "छोटे नवाब" म्हणून ओळखलं जातं, त्यांनी इंग्लंडमधील लॉकर्स पार्क स्कूल आणि विचेस्टर कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट इंग्लंडमधून शिक्षण घेतलं आहे. याशिवाय, युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथईस्ट एशियामधून त्यांनी इंटरनॅशनल ग्रॅज्युएशन डिग्रीही घेतली आहे.
फिल्म दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा वरुण धवन यांनी युनायटेड किंगडममधील नॅटीगॅम स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस स्टडीजमध्ये डिग्री केली आहे.