Monika Shinde
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस 'कामगार दिन' म्हणूनही ओळखला जातो.
हा दिवस महाराष्ट्र दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.
राज्यभर झेंडावंदन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शासकीय समारंभ आयोजित केले जातात.
पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? चला तर मग जाणून घेऊया!
स्वातंत्र्यानंतर भारतात भाषावार प्रांतरचना करण्याची गरज वाटू लागली
संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. यावेळी मुंबईसह सर्व मराठी भाषिक भाग एकत्र करून स्वतंत्र महाराष्ट्र तयार व्हावा, ही प्रमुख मागणी होती.
या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. मुंबईसाठी लढा अधिक तीव्र होता.
केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना कायदा १९५६ अंतर्गत भाषावार राज्य निर्मितीचा निर्णय घेतला. गुजरात आणि महाराष्ट्र स्वतंत्र करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.
ह्या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्यं निर्माण करण्यात आली.
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य मानलं जातं.
मुंबईसारखे महानगर, उद्योग, शेती, शिक्षण आणि चित्रपटसृष्टी यामध्ये राज्याने मोठी प्रगती केली आहे.