सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खान याचा आज वाढदिवस! 27 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेला सलमान आता 59 व्या वर्षात पदार्पण करतोय.
सलमान खानने 1988 साली 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, 1989 मध्ये आलेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाने त्याला एक मोठा सुपरस्टार बनवलं.
हम आपके हैं कौन,' 'करण अर्जुन,' 'हम दिल दे चुके सनम,' 'तेरे नाम,' 'वॉन्टेड,' 'दबंग,' 'बजरंगी भाईजान,' आणि 'एक था टायगर ' अशा सुपरहिट चित्रपटात काम केले.
सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरुन कायम चर्चेत असतो. विशेष म्हणजे, सलमान अजूनही सिंगल आहे. त्याचे काही कथित कारणे आहेत.
एकेकाळी, सलमान व ऐश्वर्या एकत्र होते. मात्र, ब्रेकअपनंतर सलमान एकटा पडला, व त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जाते.
त्यासोबतच, संगीता बिजलानी व सलमान खान लग्न करणार होते. परंतु काही कारणाने त्यांचे लग्न मोडले.
सोमी खान, लुलिया वंतूर आणि कतरिना कैफ सलमान खानच्या आयुष्यात आल्या , परंतु त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.
सलमान खानच्या लग्न न होण्याचे अजून एक कारण म्हणजे, त्याला वाटते की, तो खूप रागीट आहे. त्यामुळे अनेकांची नाती बिघडली. जर त्याने लग्न केले तर रागामुळे त्याचे नाते बिघडू शकते असे त्याला वाटते.
सलमानच्या चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाच्या चर्चा कायम रंगत असतात.