Aarti Badade
मासे प्रेमींसाठी बोंबील रस्सा म्हणजे सुखद अनुभव. ओले किंवा सुके बोंबील वापरून बनवलेला हा तर्रीदार रस्सा थंडीच्या दिवसांत शरीरात ऊब भरतो.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
ताजे किंवा सुके बोंबील, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण वाटण, घरगुती लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीसाठी आंबट आमसुले (कोकम).
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
बोंबील स्वच्छ धुवून घ्या. जर तुम्ही सुके बोंबील वापरणार असाल, तर ते १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून ते मऊ होतील.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
आलं, लसूण आणि थोडा कांदा एकत्र वाटून घ्या. ताज्या वाटणामुळे रश्श्याला एक वेगळाच खमंगपणा आणि दाटपणा येतो.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
पातेल्यात तेल गरम करून कढीपत्ता आणि कांदा परता. कांदा लालसर झाल्यावर त्यात तयार वाटण आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
Bombil Rassa recipe Marathi
sakal
आता हळद, घरगुती लाल तिखट (आगरी-कोळी मसाला असेल तर उत्तम) आणि गरम मसाला घालून मसाले नीट भाजून घ्या. मसाल्याचा सुवास सुटला की चव वाढते.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
मसाल्यात बोंबील घालून २ मिनिटे परता. आता गरजेनुसार पाणी, आमसुले आणि मीठ घाला. मंद आचेवर १०-१२ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून बोंबीलची चव रश्श्यात उतरेल.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. तुमचा झणझणीत बोंबील रस्सा तयार आहे! तांदळाची भाकरी किंवा गरम भातासोबत याचा आस्वाद घ्या.
Bombil Rassa recipe Marathi
Sakal
Crispy Bangda Fry
Sakal