Aarti Badade
मासे प्रेमींसाठी बांगडा फ्राय म्हणजे पर्वणीच! घरीच हॉटेलसारखा कुरकुरीत बांगडा कसा बनवायचा, त्याची ही सोपी रेसिपी.
Crispy Bangda Fry
Sakal
ताजे बांगडे, मालवणी मसाला (किंवा तिखट), हळद, मीठ, कोकमाचं आगळ, बारीक रवा आणि तांदळाचं पीठ.
Crispy Bangda Fry
Sakal
बांगडे स्वच्छ धुवून त्याला सुरीने ३-४ आडव्या चिरा (Cuts) द्या. यामुळे आपण लावलेला मसाला माशाच्या अगदी आतपर्यंत मुरतो आणि चव वाढते.
Crispy Bangda Fry
Sakal
तिखट, हळद, मीठ आणि कोकमाचं आगळ एकत्र करून बांगड्यांना नीट चोळून घ्या. १५-२० मिनिटे हे मासे मुरवण्यासाठी बाजूला ठेवा.
Crispy Bangda Fry
Sakal
एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. तांदळाच्या पिठामुळे माशांना छान कुरकुरीतपणा येतो आणि रवा तडका वाढवतो.
Crispy Bangda Fry
Sakal
मॅरीनेट केलेले बांगडे रवा-तांदळाच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्या, जेणेकरून पिठाचा पातळ थर सर्वत्र लागेल.
Crispy Bangda Fry
Sakal
तव्यावर तेल गरम करून मध्यम आचेवर बांगडे फ्राय करा. दोन्ही बाजूंनी ५-६ मिनिटे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळा.
Crispy Bangda Fry
Sakal
गरमागरम बांगडा फ्राय, लिंबू, कांदा आणि तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करा. तुमच्या जेवणाची रंगत नक्कीच वाढेल!
Crispy Bangda Fry
Sakal
Surmai Fry Recipe
Sakal