Aarti Badade
व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे जीवनसत्त्व आहे, जे हाडं मजबूत ठेवतं, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं.
पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, चुकीचा आहार, किंवा शरीरात शोषणाची अडचण यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होते.
थकवा, चक्कर, बेशुद्ध पडणे, स्नायूंमध्ये दुखणं, आणि हाडं कमजोर होणं ही मुख्य लक्षणं आहेत.
व्हिटॅमिन डीची कमतरता कॅल्शियमचं शोषण कमी करते, ज्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
सकाळच्या सूर्यप्रकाशात 15–20 मिनिटं रोज बसल्यास शरीर स्वतःहून व्हिटॅमिन डी तयार करतं.
अंडी, मासे (सॅल्मन, सार्डीन), गोमांस यकृत, चीज, बटर, दूध हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत.
कमी प्रमाण असल्यास पूरक गोळ्या घेणं फायदेशीर ठरू शकतं, पण त्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.