Anushka Tapshalkar
आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा एक नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात.
आवळा केसांच्या मुलांना पोषण देतो आणि स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतो. यामुळे केसांच्या मुळांना मजबूत होण्यास मदत होते आणि केस गळणे कमी होते. आवळा केसांची वाढ जलद करतो आणि केस जाड व मजबूत करण्यास मदत करतो.
आवळ्याच्या तेलाने डोक्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरणास मदत होते. हे तेल वापरण्यापूर्वी कोमट करुन घ्यायला विसरु नका. रात्रभर किंवा धुण्याआधी किमान एक तास तसेच राहू द्या. आठवड्यातून २-३ वेळा याचा वापर करा.
आवळ्याची पावडर पाणी, खोबरेल तेल किंवा दह्यात मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्कॅल्पवर आणि संपूर्ण केसांमध्ये चांगल्या प्रकारे लावा, धुण्यापूर्वी 30 मिनिटांसाठी ठेवा. यामुळे केसातील कोंडा कमी होऊन केस चमकदार होतात.
तुमच्या केसांना आतून पोषण देण्यासाठी रोज आवळ्याचा रस प्या. आवळा व्हिटॅमन सीचे उच्च स्रोत आहे. यामुळे केसाच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असलेलया कोलेजनचे उत्पादन वाढवते.
आवळा पावडर शिकेकाई आणि रीठ्यामध्ये मिक्स करुन केसांसाठी नैसर्गिक क्लीनझर तयार करा. शॅम्पूऐवजी याचा तुम्ही केस धुण्यीसाठी वापर करु शकता. यामुळे स्काल्प निरोगी राहतो आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
आवळ्याचे काप वाळवून नंतर ते खोबरेल तेलात गडद होईपर्यंत उकळा. तेल थंड करून, गाळून नंतर एका बाटलीत ओतून ठेवा. केसांच्या वाढीसाठी तसेच केस गळणे कमी होण्यासाठी याचा नियमित वापर करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.