इम्युनिटी वाढवणारा अन् पचनाला मदत करणारा हा कोल्हापुरी 'पांढरा रस्सा' नक्की बनवा!

Aarti Badade

कोल्हापुरी पांढरा रस्सा – पारंपरिक चिकन रेसिपी

कोल्हापुरी स्वयंपाकघरातील खास पारंपरिक चव – नारळाच्या दुधात शिजवलेला, साजूक तुपात फोडणी दिलेला, स्वादिष्ट पांढरा रस्सा.

kolhapuri pandhra rassa | Sakal

लागणारे साहित्य

चिकन स्टॉक, नारळाचे दुध, काजू, बदाम, पांढरे तीळ, खसखस, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, जीरे, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्र, मिरी, स्टारफुल, जावेत्री, दालचिनीचे तुकडे, साजूक तुप, मीठ, कोथिंबीर

kolhapuri pandhra rassa | Sakal

प्रथम स्टॉक तयार करा

चिकन, आलं-लसूण पेस्ट, हळद व मीठ पाण्यात कुकरमध्ये ६-७ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. नंतर चिकन स्टॉक वेगळा ठेवा.

kolhapuri pandhra rassa | Sakal

नारळाचं दूध व पेस्ट तयार करा

ओल्या नारळाचे दूध काढा. भिजवलेले काजू, बदाम, तीळ, खसखस यांची पेस्ट तयार ठेवा.

kolhapuri pandhra rassa | Sakal

रस्सा शिजवण्याची प्रक्रिया

चिकन स्टॉकमध्ये नारळाचे दूध व पेस्ट मिसळा. साजूक तुपात जीरे व मसाले फोडणीला घ्या. मिरच्या, आलं-लसूण पेस्ट टाका. नंतर स्टॉक मिश्रण मिसळा.

kolhapuri pandhra rassa | Sakal

शेवटची उकळी

मिश्रण एक उकळी येईपर्यंत शिजवा. चवीनुसार मीठ घाला. गॅस बंद करा आणि व्यवस्थित ढवळा.

kolhapuri pandhra rassa | Sakal

कोथिंबिरीने सजवा

गरमागरम पांढरा रस्सा वाटीत ओता, वरून कोथिंबीर भुरा, आणि चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा!

kolhapuri pandhra rassa | Sakal

घरगुती मटण सुप रेसिपी; सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

Mutton Soup recipe | Sakal
येथे क्लिक करा