Aarti Badade
थंडी, सर्दी, ताप यामध्ये मटण सुप खूप उपयुक्त ठरतं. चविष्ट आणि पौष्टिक असं हे सुप कधीही पिऊ शकतो!
३०० ग्रॅम मटण,१ हिरवी मिरची,१ चमचा आले-लसूण पेस्ट,१ चमचा दही,चिमूटभर हळद, १/४ चमचा मिरी,मीठ चवीनुसार,१/२ लिंबू,(ऐच्छिक – गरम मसाले)
मटण धुऊन त्यात दही, हळद, मीठ, मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा.
मॅरिनेट केलेलं मटण ३ ग्लास पाण्यात शिजवा. हवे असल्यास गरम मसाल्याची फोडणी करून वापरू शकता.
मटण शिजल्यावर त्यातलं पाणी म्हणजेच सूप एका वाटीत घ्या. लिंबू पिळा आणि मिरी पूड घाला.
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सुप सर्व्ह करा. आरोग्यदायी आणि चवदार पेय!
एकदा नक्की करून पाहा – चव आणि पोषण यांचा उत्तम मिलाफ आहे.