Anushka Tapshalkar
चांगले आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यासाठी घरगुती, नैसर्गिक घटक, जसेकी ताजी फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती यांचे सेवन प्रतिकारशक्ती वाढवतात, पचन सुधारतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवतात.
Health
sakal
भारतीय मसाल्यांचा राजा म्हणजे मिरे! हे मिरे काळे, पांढरे आणि हिरव्या रंगातही उपलब्ध असतात. चवीला तिखट असलेले, हवाबंद डब्यात ठेवले तरी महिनाभर ताजे राहणारे हे मिरे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Pepper
sakal
यात पिपराईन, अ-ब-क व ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, जस्त(Zinc), कॅरोटिन्स, झिया झेंन्थिन, क्रिप्टो झेंन्थिन अशा पोषक घटकांचा समावेश असतो.
Important Elements
sakal
मिऱ्यांतील घटक शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे पेशीवरील तणाव कमी होतो आणि अवयवांचे संरक्षण होते.
Effect of Antioxidants
sakal
कॅरोटिन्स व झेंन्थिन यांसारखे घटक शरीरातील पेशींना ताजेतवाने ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
Boosts Immunity
sakal
सर्दी, खोकला, सायनुसायटिस, घशाचा त्रास यावर मिरे फायदेशीर आहेत. सूज कमी करणे, कफ पातळ करणे आणि ताप कमी करणे यासाठी उपयोग होतो.
Beneficial for Respiratory System
sakal
सहा-आठ मिरे ठेचून कपभर पाण्यात उकळा. दिवसातून ३–४ वेळा प्या. अॅसिडिटी असल्यास चार मिरे, गूळ व साजूक तूप घालून प्यावे.
Herbal Tea
sakal
मिरे नियमित खाल्ल्यास अपचन आणि गॅस दूर होतो. सूप, कोशिंबीर, डाळी, उसळी अशा पदार्थांत मिरेपूड घालावी.
Helpful for Digestion and Bloating
sakal
पचन सुधारल्याने शरीराला पोषक घटक नीट मिळतात आणि त्यातून प्रतिकारशक्ती वाढते.
Nutrition for Body
sakal
Best Herbal Drink for Cold
sakal