वाढत्या वयातही दिसाल तरुण! चेहऱ्यावरील सुरकुत्या अन् डाग घालवण्यासाठी करा 'हे' 5 उपाय

Aarti Badade

सुंदर त्वचेचे गुपित - कोलेजन

सुंदर आणि निरोगी त्वचा प्रत्येकालाच हवी असते. 'कोलेजन' हे एक विशेष प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेला लवचिकता प्रदान करते. वयानुसार हे कमी झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

Boost Skin Collagen

|

Sakal

भरपूर पाणी प्या (Hydration)

मऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. पुरेशा पाण्यामुळे नैसर्गिकरीत्या कोलेजन वाढण्यास मदत होते.

Boost Skin Collagen

|

Sakal

अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करा

अँटिऑक्सिडंट्स त्वचा डिटॉक्स करण्यास आणि पेशींमधील रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करून कोलेजनची निर्मिती वाढवतात.

Boost Skin Collagen

|

Sakal

व्हिटॅमिन सी चे महत्त्व

व्हिटॅमिन सी त्वचेसाठी वरदान आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू नाहीसे होतात. आहारात संत्री, लिंबू आणि आवळा यांसारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा समावेश नक्की करा.

Boost Skin Collagen

|

Sakal

हंगामी फळे खा

ऋतूनुसार मिळणारी फळे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक पोषक तत्वे मिळतात. फळांमधील घटक त्वचेला 'फ्री रॅडिकल्स'पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि त्वचा तरुण ठेवतात.

Boost Skin Collagen

|

Sakal

पालेभाज्यांचा आहारात वापर

भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषणतत्वे असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Boost Skin Collagen

|

Sakal

अंतर्गत काळजी घ्या!

सौंदर्य प्रसाधने बाह्य चमक देतात, पण आहार आणि जीवनशैलीतील बदल त्वचेला अंतर्गत पोषण देतात. आजपासूनच या ५ सवयी लावा आणि सुरकुत्यांना निरोप द्या!

Boost Skin Collagen

|

Sakal

कमी बजेटमध्ये निसर्गभ्रमंती? मग मुंबईजवळच्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Igatpuri Tourism Places to Visit

|

Sakal

येथे क्लिक करा