Aarti Badade
लोणावळा आणि महाबळेश्वरच्या गर्दीला कंटाळला असाल, तर मुंबईजवळचं इगतपुरी हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथील शांतता मनाला भुरळ घालते.
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal
इगतपुरी मुंबईपासून साधारण १४०-१४८ किलोमीटर अंतरावर आहे. थंड हवामान, ढगांनी आच्छादलेले डोंगर आणि विलोभनीय धबधबे ही या ठिकाणाची ओळख आहे.
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal
इगतपुरीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे अशोक धबधबा. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा धबधबा आपल्या पूर्ण वैभवात असतो, जो पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal
इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी त्रिंगलवाडी किल्ला बेस्ट आहे. किल्ल्यावरून खाली दिसणारे रेल्वे ट्रॅक, दऱ्या आणि पर्वतांचे दृश्य मंत्रमुग्ध करते.
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal
कुटुंबीयांसोबत 'वन डे पिकनिक'साठी भावली धरण अतिशय सुंदर आहे. येथील अथांग पाणी आणि आजूबाजूची दाट हिरवळ मनाला ताजेतवाने करते.
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal
खोल दऱ्या आणि वळणदार रस्त्यांसाठी कॅमल व्हॅली प्रसिद्ध आहे. येथून घाटांचे विहंगम दृश्य दिसते, जे फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे.
Igatpuri Tourism Places to Visit
sakal
मुंबईहून खाजगी वाहनाने अवघ्या ३ तासांत तुम्ही इगतपुरीला पोहोचू शकता. ट्रेननेही येथे सहज जाता येते.
Igatpuri Tourism Places to Visit
sakal
Kolhapur historical places
Sakal