लग्नाआधीच घ्या काळजी! पुरुषांनी 30 व्या वर्षी हे 5 पदार्थ खाल्ल्यास फर्टिलिटी राहील मजबूत

Aarti Badade

पुरुषांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको!

अनेकदा वयाच्या ३० नंतर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत नैसर्गिकरीत्या घट होऊ लागते. शुक्राणूंची गुणवत्ता कमी झाल्यामुळे भविष्यात अपत्यप्राप्तीसाठी अडचणी येऊ शकतात.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

शुक्राणूंची गुणवत्ता

प्रजनन क्षमता चांगली राहण्यासाठी शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि रचना योग्य असणे गरजेचे असते. निरोगी शुक्राणूचे डोके अंडाकृती आणि शेपूट लांब असते.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

झिंक (Zinc) - पुरुषांचे 'सुपरफूड'

झिंक टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मासे, काजू आणि विविध बियांचा (Seeds) आहारात समावेश करा.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स

शुक्राणूंच्या डीएनएला होणारे नुकसान टाळण्यासाठी अक्रोड, चिया सीड्स आणि मासे खाणे फायद्याचे ठरते. हे घटक शरीरातील सूज कमी करून प्रजनन क्षमता सुधारतात.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

अँटीऑक्सिडंट्स

शुक्राणूंना स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्जेची गरज असते. CoQ10 ही ऊर्जा पुरवते, तर रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्यांचे संरक्षण करतात.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

प्रथिनांचे महत्त्व

पेशींची निर्मिती आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी प्रथिने आवश्यक आहेत. यासाठी आहारात डाळी, कडधान्ये, अंडी किंवा कोंबडीच्या मांसाचा समावेश करा.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

'हे' त्वरित थांबवा!

धूम्रपान, अति मद्यपान, लठ्ठपणा आणि मानसिक ताण शुक्राणूंच्या गुणवत्तेला सर्वात जास्त फटका देतात. वेळीच सावध होऊन संतुलित जीवनशैली अंगीकारल्यास पश्चात्तापाची वेळ येत नाही.

Boost Sperm Count Naturally Essential Superfoods

|

Sakal

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? डॉक्टरांनी सांगितलेली 1 सोपी ट्रिक ठरेल रामबाण!

Winter Skincare tips

|

Sakal

येथे क्लिक करा