हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? डॉक्टरांनी सांगितलेली 1 सोपी ट्रिक ठरेल रामबाण!

Aarti Badade

हिवाळा आणि त्वचेच्या समस्या

हिवाळा सुरू झाला की संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडते. यामुळे खाज येणे, पांढरे चट्टे पडणे किंवा बारीक पुरळ येणे अशा समस्या डोकं वर काढतात.

Winter Skincare tips

|

Sakal

सल्ला

सोपा आणि घरगुती उपाय जो महागड्या लोशनपेक्षाही प्रभावी ठरतो.

Winter Skincare tips

|

Sakal

जादूई घटक: खोबरेल तेल

तुमच्या घरात उपलब्ध असलेले खोबरेल तेल (Coconut Oil) थंडीत त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. पण ते लावण्याची एक 'विशिष्ट पद्धत' आहे, जी आपल्याला माहिती नसते.

Winter Skincare tips

|

Sakal

सर्वात महत्त्वाची टीप

डॉक्टरांच्या मते, खोबरेल तेल कधीही कोरड्या अंगावर लावू नका. त्याऐवजी, अंघोळ झाल्यावर लगेच ओल्या अंगावर तेल लावावे.

Winter Skincare tips

|

Sakal

ओल्या अंगावरच का?

अंग कोरडे करून तेल लावल्यास ते फार काळ टिकत नाही. मात्र, ओल्या त्वचेवर तेल लावल्याने पाण्याचे रेणू आणि तेलाचा थर मिळून त्वचेतील ओलावा रात्रभर टिकवून ठेवतात.

Winter Skincare tips

|

Sakal

मॉइश्चरायझर

जर तुम्ही एलोवेरा किंवा पॅराफीन असलेले मॉइश्चरायझर वापरत असाल, तर ते सुद्धा अंग ओलसर असतानाच लावा. यामुळे त्वचा दीर्घकाळ मऊ राहते आणि खाज सुटत नाही.

Winter Skincare tips

|

sakal

नैसर्गिक चमक मिळवा

या साध्या सवयीमुळे तुमची त्वचा थंडीतही उलत नाही आणि रखरखीतपणा पूर्णपणे निघून जातो. या हिवाळ्यात 'ओल्या अंगावर तेल' ही ट्रिक नक्की वापरून पाहा!

Winter Skincare tips

|

Sakal

वारंवार स्किनकेअर प्रॉडक्ट्स बदलणं ठरू शकतं धोकादायक! जाणून घ्या 5 मोठे धोके

Skincare Mistakes to Avoid

|

Sakal

येथे क्लिक करा