सकाळ डिजिटल टीम
वयानुसार उंची वाढत नसेल तर योग्य आहार महत्त्वाचा असतो. आहारातील काही पदार्थ उंची वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.
बदामांमध्ये चांगले फॅट्स, फायबर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. हे जीवनसत्त्वे आणि खनिजे उंची वाढवण्यासाठी आवश्यक असतात.
रताळ्यांनमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतो. व्हिटॅमिन ए हाडांच्या आरोग्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी मदत करतो.
अंडी हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी भरपूर असतात. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि उंची वाढते.
बीन्समध्ये प्रथिने आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात. प्रथिने ऊंची वाढीसाठी मदत करतात.
दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.
चिकन प्रथिनांचा चांगला स्रोत आहे आणि व्हिटॅमिन B12 देखील उपलब्ध असते. हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन K हाडे मजबूत आणि उंची वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते.
सॅल्मनमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच ऊंची वाढीसाठी महत्वाचे असतात.
उंची वाढवण्यासाठी कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण प्रत्येकाच्या शरीराची आवश्यकता वेगळी असू शकते.