Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा ही लक्षणं सामान्य झाली आहेत. यामागे हिमोग्लोबिनची कमतरता असू शकते.
हिमोग्लोबिन कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची (Iron) कमतरता – विशेषतः महिला आणि मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
हिमोग्लोबिन रक्तात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे त्याची पातळी कमी झाली तर मानसिक व शारीरिक कमजोरी जाणवते.
अळीव बियाण्यापासून तयार केलेले लाडू हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम आहेत. हे बियाणं लोहतत्त्वाने समृद्ध आहे.
अळीव, भोपळा, अळशी, तीळ, गूळ, वेलची, जायफळ ही सर्व बिया नारळाच्या पाण्यात भिजवून भाजा व गुळात मिसळून लाडू तयार करा.
पालक, डाळिंब, बीट, लिंबूवर्गीय फळं यांचा समावेश आहारात करा. हे पदार्थ रक्तवाढीसाठी उपयुक्त आहेत.
जेवण बनवण्यासाठी लोखंडी भांडी वापरा. यामुळे अन्नात लोहतत्त्व मिसळते आणि शरीराला लाभ होतो.
जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेणं टाळा कारण ते लोह शोषण कमी करतात.
योग व प्राणायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि पोषक तत्वांचे शोषण चांगले होते.
थोडेसे आहार व जीवनशैलीतील बदल करून हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवता येते आणि अशक्तपणावर मात करता येते.