Aarti Badade
पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. मुलांना आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास खबरदारी घ्या.
पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी मुलांना उकळून थंड केलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच द्या.
जेवणाच्या आधी आणि नंतर मुलांनी हात धुणे गरजेचे आहे. यामुळे संसर्ग टाळता येतो.
पावसाळ्यात स्ट्रीट फूड किंवा बाहेरचे अन्न टाळा. यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका असतो.
हवामानामुळे हिरव्या भाज्यांमध्ये जंतू वाढू शकतात. पावसाळ्यात या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात.
समुद्री अन्न खाणे या काळात धोकादायक ठरू शकते. अन्न व्यवस्थित शिजवूनच मुलांना द्या.
दही, ताक आणि आंबवलेले पदार्थ पचनशक्ती वाढवतात. हे पदार्थ मुलांना आहारात द्या.
पावसाळ्यात माशा व इतर कीटक वाढतात. अन्न झाकून ठेवून मुलांना दूषित अन्नापासून वाचवा.
संपूर्ण पावसाळा निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी जरूर पाळा.