Aarti Badade
घरीच बनवा पौष्टिक आणि मसालेदार सीफूड सूप!
या खास सूपचे स्टार घटक म्हणजे स्वच्छ केलेल्या खेकड्याच्या नांग्या!
बारीक चिरलेला कांदा – २,टोमॅटो – २,लसूण पाकळ्या – ५ ते ६,स्लाईड 4
किसलेले आले – २ टेबलस्पून,बारीक चिरलेली कोथिंबीर,तिखट – आवडीनुसार,ठेचलेली काळी मिरी – ५ ते ६,मीठ – चवीनुसार
एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घालून, सर्व साहित्य मंद आचेवर शिजायला ठेवा.
सर्व जिन्नस चांगले शिजल्यावर ते गाळून घ्या. आता सूप बनवण्याची वेळ आली!
एका कढईत लोण्यावर (बटर) थोडा मैदा परतून घ्या. त्यात गाळलेले सूपचे पाणी घाला आणि सतत ढवळत राहा.
सूप उकळत असताना सतत चमच्याने ढवळा. यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि सूप एकसारखे होईल.
सूपाला एक छान उकळी येऊ द्या. उकळी आल्याबरोबर गॅस बंद करा.तयार आहे गरमागरम खेकड्याचे सूप!