वीकेंड गेटवे: महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघरमधील निसर्गरम्य बोर्डी बीच

Pranali Kodre

अथांग आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असलेल्या बोर्डीला अथांग आणि निसर्गरम्य समुद्र किनारा लाभला आहे,

Bordi Beach in Palghar

|

Sakal

उत्तम पर्यटनाचे ठिकाण

हा समुद्रकिनारा एक उत्तम पर्यटनाचे ठिकाण आहे. येथील सुरूची वनराई आणि विस्तीर्ण किनारा मोठे आकर्षण आहे.

Bordi Beach in Palghar

|

Sakal

चिकूच्या बागा आणि वारली चित्रकला

याशिवाय बोर्डी आणि घोलवड परिसर चिकू उत्पादनासाठीही प्रसिद्ध असून येथील चिकूच्या बागा आणि वारली चित्रकला पर्यटकांना आकर्षित करते.

Chikoo

|

Sakal

परिसरातील वैशिष्ट्य

चिकू फळप्रक्रिया केंद्र वारली चित्रकला प्रशिक्षण केंद्र, अस्वली धरण, ग्रामबळ शिक्षण केंद्र ही या परिसरातील वैशिष्ट्य देखील आहेत.

Warli Paintings

|

Sakal

याचा अस्वाद आवर्जून घ्या

येथे चिकूपासून बनवलेल्या चिकू शेक, चिकू जॅम चिकू पल्प यांचा अस्वाद घेता येतो. याशिवाय सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात समु्द्रातील ताजे मासेही मिळतात. येथील खारेमासे, सोलकढीचाही आस्वाद घेता येतो.

Chikoo

|

Sakal

उन्हाळ्यात पर्यटकांची गजबज

उन्हाळ्यात बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गजबज असते. त्यातही फेब्रुवारीमध्ये होणारा चिकू मोहत्सव विशेष आकर्षण असतो.

Bordi Beach in Palghar

|

Sakal

वाहतूक आणि राहण्याची सोय

दरम्यान सहलीचे नियोजन करताना वाहतुक व्यवस्थेची आधी चौकशी करावी, कारण रात्री १० नंतर येथे फारशी व्यवस्था नाही. या परिसरात राहण्यासाठी आणि भोजनासाठी मात्र बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

Bordi Beach in Palghar

|

Sakal

कसे जाता येईल?

येथे जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक घोलवड, डहाणू आहे, तर बोर्डीला बसस्थानक आहे. घोलवड रेल्वेस्थानकापासून अगदी दीड किमी अंतरावर बोर्डी किनारा आहे. डहाणूपासूनही बस किंवा रिक्षा आहेत.

Gholvad Railway

|

Sakal

विशेष सूचना

पर्यटकांनी समुद्रात खोलवर जाणे टाळावे, किनारा खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि सूचनांचे पालन करावे.

Bordi Beach in Palghar

|

Sakal

वसईतील स्वच्छ अन् शांत 'सुरुची समुद्रकिनारा' - कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्याय

Suruchi Beach, Vasai, Palghar

|

Sakal

येथे क्लिक करा