जन्म भारतातला, खेळतात बाहेरच्या देशाकडून! कोण आहेत 'हे' क्रिकेटर्स?

Anushka Tapshalkar

नासेर हुसैन

इंग्लंडचे माजी यशस्वी कर्णधार नासेर हुसैन यांचा जन्म चेन्नई (मद्रास) येथे झाला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंब इंग्लंडमध्ये जाऊन कायमचे स्थायिक झाले.

Naseer Hussain

|

sakal

हनिफ मोहम्मद

हनिफ मोहम्मद - पाकिस्तान: पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज हनिफ मोहम्मद आणि त्यांचे भाऊ मुश्ताक, सादिक व वझीर यांचा जन्म फाळणीपूर्वी भारतातील गुजरात राज्यातील जुनागढ येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले.

Hanif Mohammad

|

sakal

ईश सोढी

ईश सोढी हा न्यूझीलंडचा आघाडीचा फिरकी गोलंदाज असून त्याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला. तो केवळ चार वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.

Ish Sodhi

|

sakal

मोंटी पनेसर

मोंटी पनेसर हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला शीख खेळाडू ठरला. त्याचे आई-वडील मूळचे पंजाबमधील असून नंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते.

Monty Panesar

|

sakal

रविंदर बोपारा

रवी बोपारा यांचे कुटुंब मूळ पंजाबमधील असले तरी त्यांचा जन्म इंग्लंडमध्येच झाला आहे.

Ravinder Bopara

|

sakal

बॉब वूल्मर

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू तसेच पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांचे ख्यातनाम प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात झाला होता. त्यांच्या वडिलांनी भारतातील रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळ केला होता.

Bob Woolmer

|

sakal

सिमी सिंग

(सिमी सिंग) - आयर्लंड: त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. पंजाबकडून वयोगटातील क्रिकेट खेळल्यानंतर ते आयर्लंडला स्थलांतरित झाले आणि तेथे जाऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला प्रवास घडवला.

Simi Singh

|

sakal

डायबेटिजशी लढाई, दुखापतींवर मात; Alexander Zverev ठरला फ्रेंच ओपन चॅम्पियन!

Alexander Zverev Wins French Open 2026

|

Sakal

आणखी वाचा