संतोष कानडे
सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात असलेले बाऊन्सर्स सध्या मार्केटमध्ये सुरु असेलल्या दरांबद्दल बोलत आहेत.
मार्केटमध्ये बाऊन्सर्ससचा कचरा झाला आहे. त्याला कारण नवे आलेले लोक कमी दरामध्ये सेवा देत आहेत.
सेक्युरिटी गार्डच्या पैशांमध्ये आता बाऊन्सर्स येऊ लागले आहेत. ५०० ते ८०० रुपयांमध्ये बाऊन्सर्स येत आहेत.
अगोदर दीड दे दोन हजार रुपये एवढा एका बाऊन्सरचा दर होता. मात्र नव्याने आलेल्या लोकांमुळे हे दर कमी झाले आहेत.
एखाद्या बाऊन्सरने चार-दोन कामं केली की लगेच तो स्वतःच्या नावावर कामं घ्यायला सुरुवात करतो.
सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी लोक बाऊन्सर्स बाळगतात. स्वतःच्या सुरक्षेसाठी हे लोक पैशांकडे बघत नाहीत.
दुसरीकडे लग्न समारंभ, साखरपुडा किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये बाऊन्सर्स मागवण्याची पद्धत सुरु झालेली आहे.
त्यामुळे सध्या बाऊन्सर्सना मागणी वाढत आहे. मात्र काही लोक कमी पैशांमध्ये काम करत असल्याने पंचाईत होतेय.
विशेष म्हणजे एका चांगल्या तब्येतीच्या बाऊन्सरचा दिवसाचा खर्च ५०० रुपयांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यांना कमी पैशांमध्ये काम परवडत नाही.