'या' गावात टॅक्सी म्हणून चालते लँड रोव्हर

संतोष कानडे

लक्झरी

भारतात लक्झरी गाड्या साधारण उच्चभ्रू लोक वापरतात. पण असं एक हिमालयीन गाव आहे, जिथे लँड रोव्हर हे स्टेटस सिंबल नाही.

दार्जिलिंग

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातल्या मानेभंज्यांग या गावात लँड रोव्हर लँड रोव्हरच्या गाड्या पब्लिक ट्रान्स्पोर्टसाठी वापरल्या जातात.

लँड रोव्हर

हे एक शांत गाव असून याची ओळखच लँड रोव्हरचं गाव म्हणून आहे. येथे १९५० च्या दशकातल्या जुन्या लँड रोव्हर गाड्यांचा वापर टॅक्सी म्हणून केला जातो.

ब्रिटिश

मानेभंज्यांग गावच्या लँड रोव्हरची गोष्ट ब्रिटिश शासनाच्या काळापासून सुरु होते. तेव्हा ब्रिटिशांनी आणि चहाच्या मळ्याच्या मालकांनी या गाड्यांचा वापर सुरु केला.

लँड रोव्हर

हिमालयातले खराब रस्ते, चिखल आणि दगडांचे रस्त्यांवरुन सामान किंवा लोकांची ने-आण करण्यासाठी लँड रोव्हर गाड्या वापरल्या जायच्या.

मजबूत

या गाड्या मजबूत आणि मेन्टेन्ससाठी स्वस्त होत्या. हे गाव भारत-नेपाळ सीमेवर उंच ठिकाणी आहे. जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा अनेक गाड्या इथेच राहिल्या.

टॅक्सी

स्थानिक गावकऱ्यांनी ह्या गाड्या खरेदी केल्या आणि त्या दुरुस्त करुन वापरायला सुरुवात केली. वेळेनुसार मग या गाड्या टॅक्सी म्हणून वापरायला सुरुवात केली.

पर्यटन

पर्यटकांना हिमालयीन रस्त्यांनी घेऊन जाण्यासाठी या गाड्यांचा वापर केला जातो. पर्यटन हे या गावच्या अर्थकारणाचं प्रमुख कारण आहे.

गाडी

या गावातल्या काही गाड्या तर ७० वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. शिवाय जगातल्या सगळ्यात जुनी चालू अवस्थेत असेलली एक गाडी गावात आहे.

आयुष्य बदलून टाकणारी भारतातली ठिकाणं

<strong>येथे क्लिक करा</strong>