Aarti Badade
जेव्हा मेंदूमध्ये कॅन्सरचा ट्यूमर तयार होत असतो, तेव्हा शरीर आपल्याला काही महत्त्वाचे इशारे देते; ज्याकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते.
Brain cancer symptoms
Sakal
बोलताना अचानक योग्य शब्द न सुचणे किंवा बोलण्यात अडखळणे या समस्येला अनेकजण थकवा समजून दुर्लक्ष करतात, पण हे मेंदूशी संबंधित गंभीर लक्षण असू शकते.
Brain cancer symptoms
Sakal
चेहरा, जीभ किंवा शरीराच्या अर्ध्या भागात अचानक संवेदना कमी होणे आणि सतत सुन्नपणा जाणवणे हे मेंदूतील ट्यूमरचे मुख्य सुरुवातीचे लक्षण मानले जाते.
Brain cancer symptoms
Sakal
डोळ्यांचा नंबर नसतानाही अचानक दुहेरी (Double Vision) दिसणे किंवा सरळ वस्तू वाकड्या दिसण्याचा त्रास होणे हा मेंदूवर पडणाऱ्या दबावाचा संकेत असू शकतो.
Brain cancer symptoms
Sakal
जर तुम्हाला लिहिताना अचानक त्रास होत असेल आणि हात व डोळे यांच्यात योग्य समन्वय साधता येत नसल्याने हस्ताक्षर खूप खराब होत असेल तर सावध व्हा.
Brain cancer symptoms
Sakal
कोणत्याही कारणाशिवाय सतत तीव्र चिडचिडेपणा वाढणे, स्वभावात अचानक बदल होणे किंवा कामाचा उत्साह पूर्णपणे कमी होणे हे मेंदूच्या आजाराचे लक्षण असू शकते.
Brain cancer symptoms
Sakal
सामान्य डोकेदुखी औषधाने बरी होते; मात्र रोज सकाळी उठल्यावर होणारी, तीव्र आणि अनेक दिवस सतत राहणारी डोकेदुखी अजिबात दुर्लक्षित करू नका.
Brain cancer symptoms
Sakal
यापैकी कोणतीही लक्षणे शरीरात वारंवार आणि सतत जाणवू लागल्यास घरगुती उपायांवर वेळ न घालवता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घ्या.
Brain cancer symptoms
Sakal
Honey Never Expires Science
Sakal