ब्रेन स्ट्रोकचे किती प्रकार आहेत?

Monika Shinde

स्ट्रोक म्हणजे काय?

स्ट्रोक ही गंभीर आजाराची स्थिती आहे, ज्यात मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होते आणि पेशी नष्ट होऊ लागतात

स्ट्रोकचे मुख्य प्रकार

स्ट्रोक मुख्यतः दोन प्रकारांचे असतो इस्केमिक आणि हॅमरेजिक. दोन्ही प्रकारात मेंदूवर वेगळा परिणाम होतो

इस्केमिक स्ट्रोक काय आहे?

इस्केमिक स्ट्रोक हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात मेंदूत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अडथळा निर्माण होतो. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि मेंदूच्या पेशी नष्ट होतात.

इस्केमिक स्ट्रोकची कारणे

रक्तवाहिन्यांमध्ये थक्के, कोलेस्ट्रॉल किंवा अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस यामुळे रक्तपुरवठा अडथळा येतो. हृदयविकार असलेल्यांना धोका जास्त असतो

हॅमरेजिक स्ट्रोक काय आहे?

हॅमरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदूत रक्तवाहिनी फुटते. मेंदूत रक्त साचल्यामुळे दाब वाढतो आणि पेशी नष्ट होतात

हॅमरेजिक स्ट्रोकची कारणे

उच्च रक्तदाब, जखमा, अ‍ॅनेयुरिझम किंवा इतर रक्तवाहिनी समस्या यामुळे हा स्ट्रोक होतो.

लक्षणे कोणती?

चेहरा झुकणे, हात-पाय कमजोरी, बोलण्यात अडचण, अस्पष्ट दृष्टी, समतोल गमावणे ही स्ट्रोकची मुख्य लक्षणे आहेत.

Wedding Tips: लग्न बजेट फ्रेंडली करायचंय? वापरा हे सोपे टिप्स

येथे क्लिक करा