ब्रेन ट्युमरचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?

Aarti Badade

सतत होणारी डोकेदुखी आणि उलट्यांची लक्षणे

सतत तीव्र डोकेदुखी होणे, अचानक चक्कर किंवा फिट्स येणे, मळमळ होणे, दृष्टी धूसर होणे आणि चालताना तोल जाणे ही मेंदूच्या गाठीची प्राथमिक लक्षणे असू शकतात.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

हात-पाय सुन्न पडणे

ट्युमर मेंदूच्या ज्या भागात आहे त्यानुसार शरीराची एक बाजू अचानक कमजोर होणे, हात-पाय सुन्न पडणे किंवा व्यक्तीच्या स्वभावात अचानक बदल दिसून येतो.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

मेंदूतील पेशींची अनियंत्रित वाढ

मेंदूतील काही पेशी जेव्हा अनियंत्रितपणे वाढून त्यांची गाठ तयार होते, त्याला 'ब्रेन ट्युमर' म्हणतात; यात कॅन्सर नसलेला आणि कॅन्सर असलेला असे दोन प्रकार असतात.

Most at Risk for Brain Tumor

|

sakal

आनुवंशिक

ज्यांच्या कुटुंबात आधी कोणाला ब्रेन ट्युमर झाला आहे त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो, तसेच महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आणि वाढत्या वयात हा आजार किंचित जास्त आढळतो.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

रेडिएशनचा संपर्क

कर्करोगाच्या उपचारादरम्यान दीर्घकाळ रेडिएशन थेरपी घेतलेल्या रुग्णांना आणि न्यूरोफायब्रोमॅटोसिस किंवा ली-फ्रॉमेनी सिंड्रोम यांसारखे आनुवंशिक विकार असलेल्यांना याचा मोठा धोका असतो.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

मोबाईलचा मर्यादित वापर

ब्रेन ट्युमरपासून सुरक्षित राहण्यासाठी मोबाईल व वायरलेस उपकरणांचा अतिवापर टाळावा, ताणतणाव मुक्त राहावे आणि आहारात अँटी-ऑक्सिडंट्स युक्त पौष्टिक अन्न खावे.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

न्यूरोलॉजिकल तपासणी आवश्यक

सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास मेंदूचे कायमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणतीही शंका असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन न्यूरोलॉजिकल टेस्ट करून घ्यावी.

Most at Risk for Brain Tumor

|

Sakal

साखर वाढली की घाबरू नका! AIIMS तज्ज्ञांनी दिला डायबेटीज कंट्रोलचा सोपा मंत्र

AIIMS doctor diabetes prevention guidelines

|

Sakal

येथे क्लीक करा