सकाळ डिजिटल टीम
कुठलंही वाहन असो, त्याला ब्रेक असतोच. काही वाहनांना हँडब्रेक/पार्किंग ब्रेकही असतो. तो काम करत नसेल किंवा पुरवलाच नसेल, तर चालक आणि मालक दोघांना दंड होऊ शकतो.
एवढंच नाही, तर त्यांचे मोटर ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओ निलंबित देखील करू शकतात. असा प्रकार आपल्या तरी वाहनाच्या बाबतीत होत नाही ना, हे वाहनधारकांनी पाहिले पाहिजे.
दुचाकी किंवा तीनचाकीचा हँडब्रेक/पार्किंगब्रेक काम करत नसेल/पुरवला नसेल तर मालकास दंड पहिला १०००, दुसरा ३०००.
दुचाकी किंवा तीनचाकीचा हँडब्रेक/पार्किंगब्रेक काम करत नसेल/पुरवला नसेल तर चालकास दंड पहिला १०००, दुसरा ३०००.
दुचाकी किंवा तीनचाकी वगळता हँडब्रेक/पार्किंगब्रेक काम करत नसेल/पुरवला नसेल तर मालकास दंड पहिला २०००, दुसरा ५०००.
दुचाकी किंवा तीनचाकी वगळता हँडब्रेक/पार्किंगब्रेक काम करत नसेल/पुरवला नसेल तर चालकास दंड पहिला २०००, दुसरा ५०००.