सकाळ वृत्तसेवा
मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे शूरवीर सेनापती… श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे!
बालपणापासून तलवारबाजी, दांडपट्टा यांचा नाद! मोठेपणी मराठा सैन्यात दाखल होऊन रणांगणात आपला ठसा उमठवला.
फक्त ११ मराठा सैनिकांनी निजामाच्या हत्तीची अंबारी खाली पाडली. यामागे होते दत्ताजींचं बुद्धिमान नेतृत्व!
सिंदखेड्याजवळील लढाईत निजामाचा पराभव. नळदुर्ग किल्ला आणि २५ लाखांचा प्रांत स्वराज्यात सामील.
भाऊ जयाप्पा शिंदे यांच्या मृत्यूनंतरही दत्ताजी खचले नाहीत. मारवाड जिंकून ५ कोटींहून अधिक खंडणी मिळवली.
दत्ताजींनी दिल्लीसाठी मृत्यूपर्यंत लढण्याचा निर्धार केला.
नजीब समोर व अब्दालीच्या फौजेमागे, अशा कात्रीत मराठा तुकडी. तलवारीसमोर बंदुका आणि तोफा – पण दत्ताजींनी हार मानली नाही.
अखेरच्या क्षणी दत्ताजी जखमी अवस्थेत होते. तेव्हा एका पठाणाने त्यांना टोकत विचारलं –
"क्यों पाटील, और लढोगे?"
शेवटी गळा चिरून दत्ताजींना ठार मारण्यात आले. त्यांचे अखेरचे शब्द होते , “क्यूँ नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे!”
पानिपत युद्धानंतर केवळ महादजी शिंदे वाचले. कान्हेरखेड (जि. सातारा) येथे आजही १६ खांबांचे शौर्यस्मारक वीरांची साक्ष देत उभे आहे.