ब्रेकअप करायचंय, पण जोडीदाराला दुखवायचं नाही? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की वापरा!

Monika Shinde

ब्रेकअप

ब्रेकअप हा आयुष्यातील सर्वात नाजूक आणि भावनिक क्षण असतो. चुकीच्या शब्दांमुळे किंवा वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे दोघांनाही मानसिक त्रास होऊ शकतो.

Breakup Tips

|

Esakal

जोडीदाराला दुखावणार नाही

जर तुम्ही योग्य पद्धतीने पण जोडीदाराला दुखावणार नाही असे ब्रेकअप करण्याचा विचार करत असाल, तर खाली काही पर्याय नक्की तुम्हाला मदत करतील

Breakup Tips

|

Esakal

योग्य वेळ आणि जागा

ब्रेकअप बोलताना शांत आणि खासगी ठिकाण निवडा. सार्वजनिक ठिकाणी, फोन किंवा मेसेजद्वारे ब्रेकअप करणे टाळा. समोरासमोर बोलल्यास भावना अधिक स्पष्टपणे मांडता येतात.

Breakup Tips

|

Esakal

स्पष्ट पण सौम्य बोला

तुमचा निर्णय ठाम ठेवा, पण शब्द सौम्य असावेत. आरोप न करता “मला असं वाटतं” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्यास समोरची व्यक्ती जास्त दुखावली जात नाही.

Breakup Tips

|

Esakal

शांत राहा, वाद टाळा

ब्रेकअप दरम्यान भावना तीव्र होऊ शकतात. तरीही ओरडणे, राग किंवा आरोप टाळा. संयम ठेवल्यास संवाद सुलभ राहतो आणि नातं सन्मानाने संपते.

Breakup Tips

|

Esakal

आदर कायम ठेवा

नातं संपत असलं तरी समोरच्या व्यक्तीचा आदर कमी करू नका. एकेकाळी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची होती. अपमानास्पद शब्द किंवा वागणूक टाळा.Breakup Tips

Breakup Tips

|

Esakal

ऐकून घेण्याची तयारी ठेवा

फक्त तुमचं मत मांडू नका. समोरच्या व्यक्तीलाही बोलण्याची संधी द्या. त्यांचा दृष्टिकोन समजून घेतल्यास ब्रेकअप अधिक संवेदनशील आणि समजूतदार पद्धतीने होतो.

Breakup Tips

|

Esakal

भावना व्यक्त करा

ब्रेकअप करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नेहमी प्रामाणिक आणि स्पष्ट बोला. चुकीच्या शब्दांमुळे समोरची व्यक्ती जास्त दुखावली जाऊ शकते.

Breakup Tips

|

Esakal

तब्बल 200 गेट्स, 36 प्लॅटफॉर्म्स आणि 38 लाख प्रवासी; हे स्टेशन आहे तरी कुठे?

येथे क्लिक करा