ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळावे?

Monika Shinde

ब्रेस्ट कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही अन्नपदार्थ आजार अधिक वाढवू शकतात. जाणून घ्या कोणते पदार्थ टाळावेत.

प्रोसेस्ड फूड

प्रोसेस्ड आणि पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये संरक्षक व रसायने असतात, जे कॅन्सर सेल्सना वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. हे पदार्थ शक्यतो टाळा

रेड मीट

अधिक प्रमाणात रेड मीट (मटण, बीफ) खाल्ल्यास सूज व कॅन्सर वाढू शकतो. त्याऐवजी प्रथिनांसाठी डाळी, कडधान्ये वापरा.

ट्रान्स फॅट

बेकरी पदार्थ, फ्राय केलेले पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट असते, जे हृदय व कॅन्सरसाठी हानिकारक असते. अशा तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

साखर आणि गोड पदार्थ

जास्त साखर सेवन केल्यास शरीरातील इन्सुलिन लेव्हल वाढतो, जे काही कॅन्सर प्रकारांना चालना देऊ शकते. शक्यतो नैसर्गिक गोडवा वापरा.

मद्यपान

अल्कोहोल हे ब्रेस्ट कॅन्सरचा मोठा जोखमीचा घटक आहे. अगदी कमी प्रमाणातही घेतल्यास धोका वाढतो. पूर्णपणे टाळलेलेच चांगले.

उच्च सोडियम असलेले पदार्थ

फास्ट फूड्स व तयार सूप यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. घरचे कमी मीठ असलेले अन्न खा.

चांगल्या आरोग्यासाठी काय निवडावं?

ताज्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्ये, आणि अँटी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा आहार घ्या. योग्य आहाराने कॅन्सरवर मात करण्यास मदत होऊ शकते.

मक्याच्या भाकरीत लपलेलं आरोग्य! जाणून घ्या कोणते महत्त्वाचे व्हिटॅमिन्स मिळतात

येथे क्लिक करा