पुजा बोनकिले
आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वत:साठी वेळ काढणे शक्य होत नाही.
अशावेळी स्वत:साठी वेळ काढायचा असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
दिवसाची सुरुवात स्वतःपासून करा. सकाळी उठल्यावर स्वतःला दहा मिनिटं द्या. ध्यान करा, स्ट्रेचिंग करा किंवा शांतपणे पहिला चहाचा आस्वाद घ्या.
दैनंदिन दिनचर्येमध्ये स्वतःला प्राधान्य द्या. तुमच्या आवडीचे कपडे घाला. वेळेवर जेवा किंवा तुमच्या त्वचेची काळजी घ्या.
आठवड्यातून एखादा दिवस स्वतःसाठी ठेवा. त्यात एखादा छंद जोपासा, आवडती मालिका बघा, पुस्तक वाचा किंवा मैत्रिणींबरोबर काहीतरी योजना करा.
अनावश्यक आणि तुम्हाला आनंद न देणाऱ्या जबाबदाऱ्यांना नाही म्हणा. नाही म्हणताना अजिबात अपराधी वाटून घेऊ नका
तुमच्या स्वतःच्या वेळेचा हिशेब ठेवा आणि तो कुठे वाया जातोय हे ओळखा.