ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केली होती भारतीय सैन्यातील सर्वात खतरनाक ‘रेजिमेंट'

सकाळ वृत्तसेवा

गोरखा रेजिमेंट – शौर्याचे प्रतीक

भारतीय लष्करातील सर्वात धाडसी रेजिमेंट. गोरखा जवानांचे शौर्य जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांची लढाईची तयारी, जिगर आणि निष्ठा अद्वितीय आहे.

Nepali Gurkhas | Sakal

गोरखा रेजिमेंटचा इतिहास

१८१५ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने गोरखा रेजिमेंटची स्थापना केली. १९४७ नंतर ही रेजिमेंट भारतीय लष्कराचा अभिन्न भाग बनली.

Nepali Gurkhas | Sakal

प्रतिष्ठित 'खुकरी' शस्त्र

गोरखा सैनिकांची ओळख म्हणजे त्यांचे खास वक्राकार शस्त्र – खुकरी! लढताना हे शस्त्र प्रभावी आणि घातक हत्यार ठरते.

Nepali Gurkhas | Sakal

ताकद आणि तंदुरुस्ती

गोरखा सैनिक ताकद, तंदुरुस्ती आणि लवचिकतेसाठी ओळखले जातात. कठीण परिस्थितीतही लढण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे.

Nepali Gurkhas | Sakal

निर्भय योद्धे

गोरखा सैनिक मृत्यूला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवतात. त्यांचं शौर्य पाहून शत्रूही घाबरतो!

Nepali Gurkhas | Sakal

ऐतिहासिक युद्धांतील सहभाग

१९६२ भारत-चीन युद्ध, १९७१ भारत-पाक युद्ध आणि कारगिल युद्धात गोरखा रेजिमेंटने निर्णायक भूमिका बजावली.

Nepali Gurkhas | Sakal

कमी संख्या, मोठा प्रभाव

इतिहासात अनेक वेळा गोरखा सैनिकांच्या लहान गटांनी मोठ्या शत्रू सैन्याचा पराभव केला आहे.

Nepali Gurkhas | Sakal

गोरखा रेजिमेंटचा युद्धनारा

“जय महाकाली, अयो गोरखाली!” – या घोषणेमुळे गोरखा सैनिकांना बळ मिळते आणि शत्रूंच्या मनात भीती निर्माण होते.

Nepali Gurkhas | Sakal

जागतिक आदर

गोरखा जवान भारतातच नाही तर नेपाळ आणि ब्रिटीश लष्करातही सेवा देतात. जगभरातील सैन्य दल त्यांच्या शौर्याचे कौतुक करतात.

Nepali Gurkhas | Sakal

शौर्यचा वारसा

गोरखा रेजिमेंट म्हणजे शौर्य, निष्ठा आणि वीरता. त्यांचा वारसा आणि योगदान प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.

Nepali Gurkhas | Sakal

उरलेल्या चपातीचं काय करू? असं बनवा चवदार वेफर्स

Chapati wafers | esakal
येथे क्लिक करा