इंग्रजांच्या काळात भारतात पेट्रोल-रॉकेल कुठून यायचं?

Yashwant Kshirsagar

आजचा तणाव, कालचा इतिहास

पश्चिम आशियातील इराण-अमेरिका तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या भीतीने जागतिक तेलबाजार हादरला आहे. भारताचे परदेशी तेलावरील अवलंबित्व पुन्हा चर्चेत आहे. पण ब्रिटिश काळात पेट्रोल-रॉकेल कोठून येत होते?

British India Oil History 

|

esakal

रॉकेलची प्रचंड मागणी

१९व्या शतकाच्या अखेरीस आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात वाहतूक आणि प्रकाशयोजनेसाठी रॉकेलची मागणी झपाट्याने वाढली. वाहनांची संख्या कमी असूनही केरोसीन हा मुख्य इंधन होता.

British India Oil History 

|

esakal

मुख्य स्रोत: बर्मा (म्यानमार)

ब्रिटिश प्रशासन प्रामुख्याने शेजारील बर्मावर अवलंबून होते. बर्मामधील तेलक्षेत्रांतून कच्चे तेल आणि इंधन भारतीय बंदरांपर्यंत मोठ्या प्रमाणात आणले जात असे.

British India Oil History 

|

esakal

मध्य-पूर्वेकडील पुरवठा

बर्मासोबत इराण, इराक आणि सौदी अरेबिया यांसारख्या मध्य-पूर्वेकडील देशांतील तेलविहिरींतूनही इंधनाचा पुरवठा केला जात असे.

British India Oil History 

|

esakal

बाजारावर वर्चस्व

कच्च्या तेलाची आयात, साठवणूक आणि विक्री काही मोजक्या परदेशी कंपन्यांच्या हातात होती. बर्मा ऑईल कंपनी सर्वात शक्तिशाली होती.

British India Oil History 

|

esakal

बर्मा-शेलचा जन्म

१९२८ मध्ये एशियाटिक पेट्रोलियम आणि बर्मा ऑईल कंपनी एकत्र येऊन बर्मा-शेल स्थापन झाली. स्वातंत्र्यानंतर ही कंपनी भारत पेट्रोलियम (BPCL) झाली. कॅल्टेक्स आणि स्टँडर्ड व्हॅक्यूम या अमेरिकन कंपन्याही बाजारात होत्या.

British India Oil History 

|

esakal

भारतातील पहिला तेल शोध

१८६६ मध्ये आसामच्या जंगलात तेलाचे अंश आढळले. १८८९ मध्ये दिगबोई येथे पहिली यशस्वी व्यावसायिक तेलविहीर खोदण्यात आली.

British India Oil History 

|

esakal

‘दिगबोई’

रेल्वेचे रूळ टाकणाऱ्या हत्तींच्या पायांना काळा चिकट पदार्थ लागला. ब्रिटिश अभियंत्यांनी “Dig, boy, dig!” असे ओरडले. त्याच वाक्प्रचारावरून दिगबोई हे नाव पडले, असे मानले जाते.

British India Oil History 

|

esakal

आशियातील पहिली रिफायनरी

१९०१ मध्ये आसाम ऑईल कंपनीने दिगबोई येथे आशियातील पहिली आधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला. आजही त्याला भारतीय पेट्रोलियम उद्योगाची ‘गंगोत्री’ मानले जाते.

British India Oil History 

|

esakal

आयात तरीही सुरूच

देशांतर्गत उत्पादन असूनही दिगबोई रिफायनरीची क्षमता अपुरी होती. त्यामुळे अविभाजित भारताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून तेल आयात सुरूच राहिली.

British India Oil History 

|

esakal

एअर होस्टेस गळ्याभोवती स्कार्फ का घालतात? फॅशन नाही; 'हे' आहे थक्क करणारे कारण

Why Air Hostess Wear Scarf

|

esakal

येथे क्लिक करा