इंग्रजांना पळता भुई थोडी करणारे,प्रतिसरकारचे निर्माते; क्रांतिसिंह नाना पाटील!

सकाळ डिजिटल टीम

सांगलीचा भूमिपुत्र

सांगलीतील येडे मच्छिंद्र येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाना पाटील (३ ऑगस्ट १९०० - ६ डिसेंबर १९७६) यांनी ब्रिटिश हुकूमशाहीविरोधात सशस्त्र बंड पुकारले. बहुजन समाजाच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

Son of Sangli

|

sakal 

१९४७ आधीच १५०० गावे मुक्त!

१९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात भूमिगत राहून नानांनी इंग्रजी सत्ता उखडून टाकली आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १,५०० गावे स्वतंत्र केली.

Liberated 1,500 Villages Before 1947!

|

sakal 

इंग्रजांना धडकी भरवणारे 'पत्रीसरकार'

साताऱ्यात 'प्रतिसरकार' आणि 'तुफान सेना' उभारली. इंग्रजांचे हेर आणि अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करत ब्रिटिश यंत्रणा बंद पाडली.

'Patri Sarkar' That Terrified the British

|

sakal 

'आपुला आपण करू कारभार'

खेड्यांमध्ये पंचसभा व लोकन्यायालये सुरू करून गावे स्वयंपूर्ण केली. इंग्रजी न्यायालयांवर बहिष्कार टाकत 'ग्रामराज्य' आणले.

'Our Governance, Our Way'

|

sakal 

संसदेत पहिली मराठी गर्जना!

स्वातंत्र्यानंतर सातारा व बीडचे खासदार म्हणून निवडून आले. देशाच्या संसदेत पहिल्यांदाच मराठीत भाषण करून दिल्लीत मराठीचा आवाज घुमवला.

Marathi in Parliament!

|

sakal 

सत्यशोधक ते संयुक्त महाराष्ट्र लढा

फुले-शाहूंच्या विचारांचा वारसा चालवत अंधश्रद्धा व अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला; तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले.

Legacy

|

sakal 

'गांधी-विवाह पद्धत' आणि व्यसनमुक्ती

लग्नातील उधळपट्टी रोखण्यासाठी साध्या 'गांधी-विवाह' पद्धतीची सुरुवात केली आणि गावोगावी व्यसनमुक्ती व शिक्षणाचा प्रसार केला.

'Gandhi-Vivah' and Anti-Addiction Drive

|

sakal 

सरकारी नोकरीचा त्याग!

१९१६ मध्ये मिळालेली तलाठ्याची सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी देशसेवा आणि स्वातंत्र्याचा मार्ग निवडला.

Sacrificed a Government Job for Revolution!

|

sakal 

 'या' १० देशांमध्ये भारतीय वापरू शकतात UPI...

10 countries where Indians can use UPI

|

sakal 

आणखी वाचा