Monika Shinde
तुम्ही बाहेर फिरायला जायचे विचार करत असाल तेही बजेटमध्ये मग या ठिकाणांना भेट देऊ शकता
नेपाळ हा भारतीयांना व्हिसा-मुक्त देश असून रस्त्याने किंवा विमानाने सहज पोहोचता येतो. हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेली निसर्गसौंदर्यपूर्ण ठिकाणं, प्राचीन मंदिरे आणि पोखरासारखे शांत तलावशहरे येथे पाहायला मिळतात.
व्हिएतनाममध्ये हनोई आणि होई आनसारखे रंगीबेरंगी शहरं फिरा आणि फक्त १०० च्या आत गरमगरम ‘pho’ सूपचा आस्वाद घ्या. इथे राहणीमान आणि वाहतूक अत्यंत स्वस्त असून, मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हे प्रवासासाठी सर्वोत्तम हंगाम आहे.
इंडोनेशियामध्ये बालीसोबतच जावा आणि लोम्बोकसारखी निसर्गसंपन्न बेटंही पाहण्यासारखी आहेत तेही अगदी किफायतशीर दरात. भारतातून फ्लाइट्स परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत आणि भारतीयांसाठी ३० दिवसांचा व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. एप्रिल ते ऑक्टोबर हा प्रवासासाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो
श्रीलंका हा भारताच्या अगदी शेजारी असलेला सुंदर आणि विविधतेने नटलेला देश आहे. इथे निळंशार समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगरमाथ्यांची ठिकाणं आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो.
थायलंडमध्ये बँकॉकसारख्या उत्साही शहरांचं जीवंत वातावरण, सुंदर बेटं आणि शांत मंदिरे पाहायला मिळतात तेही अगदी कमी खर्चात. भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्यामुळे प्रवास आणखी सोपा आणि सहज होतो
कंबोडियामधील अंगकोर वाटसारखी प्राचीन आणि भव्य मंदिरे इतिहासप्रेमींसाठी स्वर्गसमान आहेत. येथे प्रवास करताना राहणं, खाणं आणि स्थानिक प्रवास अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.
लाओस हा शांतता आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला देश आहे. येथे मेकोंग नदीच्या काठी बोट सफरीचा आनंद घेता येतो, तर लुआंग प्रबांगमधील प्राचीन मंदिरे आणि धबधबे तुमचं मन हरखून टाकतात.