Monika Shinde
जर तुम्हाला तुमच्या काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखायचे असेल, तर हे टिप्स फॉलो करायला विसरू नका
दिवसभरातील कामे आणि विश्रांती यांचे नियोजन करा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा आणि काम करा.
ऑफिसच्या कामाची वेळ संपल्यावर ईमेल्स आणि कॉल्सपासून दूर रहा. त्या वेळेचा उपयोग कुटुंबासोबत किंवा स्वतःसाठी करा.
सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेण्याऐवजी गरजेनुसार नकार देण्याची सवय लावा. यामुळे तणाव कमी होतो.
कामाच्या वेगात न जाता दर काही वेळाने छोटा ब्रेक घ्या. यामुळे मन ताजं राहतं आणि कार्यक्षमता वाढते.
योगा, ध्यानधारणा किंवा फिरायला जाणं यासारख्या गोष्टी तणाव कमी करण्यात मदत करतात.
कामाव्यतिरिक्त वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ द्या. यामुळे मानसिक समाधान मिळतं.
योग्य झोप आणि संतुलित आहार वर्क-लाइफ बॅलन्स राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत.