Monika Shinde
बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा हा सण ९ ऑगस्ट, शनिवार साजरा केला जाणार आहे.
स्टाईलिश आणि बजेटमध्ये येणारे इअररिंग्स, नेकलेस आणि ब्रेसलेट ५० ते ३०० रुपयांच्या मधल्या किमतीत आकर्षकपणे उपलब्ध आहेत.
रोजच्या वापरासाठी अगदी योग्य, दैनंदिन उपयोगी एम्ब्रॉयडरी पर्स किंवा बॅग ५०० ते १,५०० रुपयांत सहज मिळतात.
संगीतप्रेमी बहिणीसाठी चांगल्या दर्जाचे इअरबड्स ८०० ते १,५०० रुपयांपर्यंत मिळू शकतात, तर स्मार्टवॉच १,००० ते २,००० रुपयांच्या मध्यम बजेटमध्ये सहज उपलब्ध आहेत.
मोबाईलसाठी पॉवरबँक ही अत्यंत उपयुक्त भेट आहे. शिवाय, फिटनेस बँड आणि स्पीकर्स देखील १,००० ते २,००० रुपयांमध्ये चांगल्या किंमतीत मिळू शकतात.
लहान मेकअप ब्रश किट, बॉडी लोशन, बॉडी स्क्रब आणि स्पा सेट्स हे रोजच्या सौंदर्यासाठी उत्तम आणि उपयुक्त भेटवस्तू आहेत, जे ५०० ते १,५०० रुपयांच्या मध्यम बजेटमध्ये सहज मिळतात.
वाचनाची आवड असलेल्या बहिणीसाठी प्रेरणादायी पुस्तक किंवा स्वतः बनवलेली फोटो फ्रेम आणि स्क्रॅपबुक ही आठवणी जपणारी आणि अर्थपूर्ण भेटवस्तू ठरतात.
सुगंधी परफ्यूम २००–५०० रुपये दरम्यान, तसेच स्टायलिश फॉल प्रूफ वॉटर बॉटल किंवा खास डिझाईन असलेला कॉफी मग ही उपयुक्त आणि आकर्षक भेटवस्तू आहेत, ज्या रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहेत.