सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराचे बोधचिन्ह बनलेला 'बिबी का मकबरा' हा दख्खनचा ताजमहाल म्हणून ओळखला जातो.
Taj of the Deccan
sakal
कलात्मक वास्तूंवर खर्च करण्यास औरंगजेबाचा विरोध होता; पण मुलगा शहाजादा आझम शाहने न ऐकता आईच्या स्मरणार्थ ही भव्य वास्तू उभारली.
Taj of the Deccan
sakal
शहेनशहा औरंगजेबाची बेगम रबिया दुराणी (दिलराज बानू बेगम) यांच्या थडग्यावर १६५० ते १६६० च्या दशकात हा मकबरा बांधण्यात आला.
Taj of the Deccan
sakal
स्थानिक जनतेवर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी अन् दक्षिण भारतात मुघल साम्राज्याचा धाक निर्माण करण्यासाठी ही इमारत बांधली गेली.
Taj of the Deccan
sakal
आग्रा येथील ताजमहाल पूर्णपणे संगमरवरी आहे; तर बिबी का मकबऱ्यासाठी बजेटअभावी टिकाऊ दगड आणि त्यावर संगमरवरी पॉलिश वापरले गेले.
Taj of the Deccan
sakal
आग्रा ताजमहाल बांधायला २२ वर्षे लागली; तर वास्तुरचनाकार अताउल्ला आणि हंसपत राय यांनी हा मकबरा अवघ्या १० वर्षांत ६.६८ लाख रुपयांत पूर्ण केला.
Taj of the Deccan
sakal
८ चौ.मी.च्या भव्य चौथऱ्यावर उभारलेल्या या १५० फूट उंच वास्तूच्या चारही कोपऱ्यांवर आकर्षक अष्टकोनी मिनार बांधण्यात आले आहेत.
Taj of the Deccan
sakal
मकबऱ्याच्या मध्यभागी खाली पायऱ्यांवर बेगमचे थडगे असून, दिवसभरात सूर्य अन् चंद्राची किरणे थेट थडग्यावर पडावीत अशी रचना केली आहे.
Taj of the Deccan
sakal
त्या काळात पाणीपुरवठ्यासाठी ५ विहिरी अन् बोगदे बांधून जवळच्या 'खाम' नदीचे पाणी भूमिगत कालव्याद्वारे मकबऱ्याच्या हौदात आणले जात होते.
Taj of the Deccan
sakal
मुघलांशी लढणाऱ्या 'या' राणीला तिच्याच सैनिकांनी का मारले? पाहा थरारक कहाणी!
Warrior Queen of Ahmednagar and Bijapur
sakal