मुघलांशी लढणाऱ्या 'या' राणीला तिच्याच सैनिकांनी का मारले? पाहा थरारक कहाणी!

सकाळ डिजिटल टीम

अकबराला नमवणारी वीरांगना

१६ व्या शतकात अहमदनगर अन् विजापूरच्या रक्षक असणाऱ्या चांद बिबी यांनी अकबर बादशहाच्या बलाढ्य सैन्याला जोरदार टक्कर दिली होती.

The Tragic End of Chand Bibi

|

sakal 

चांदबिबी

चांदबिबीचा जन्म १५५० मध्ये अहमदनगर (अहिल्यानगर) येथे झाला. ती नगरचा सुलतान हुसेन निजाम शाह पहिला याची कन्या होती.

Chand Bibi

|

sakal 

५ भाषांवर प्रभुत्व

चांद बिबी फक्त युद्धातच नाही, तर अरबी, फारसी, तुर्की, मराठी आणि कन्नड या ५ भाषांमध्ये निपुण होत्या; शिवाय त्या सितार वाजवण्यातही पटाईत होत्या, चित्रकलेचीही त्यांना आवड होती.

Chand Bibi

|

sakal

'चांद बावडी'

विजापूरचा सुलतान अली आदिल शाह याच्याशी लग्नानंतर, त्यांच्या प्रेमाची अन् सन्मानाची साक्ष म्हणून विजापूरच्या पूर्व सीमेवर ऐतिहासिक 'चांद बावडी' बांधण्यात आली.

Chand Bibi

|

sakal

नोव्हेंबर १५९५: मुघलांचे आक्रमण

अकबराच्या मुघल सैन्याने नगरवर हल्ला केला; तेव्हा चांद बीबींनी स्वतः किल्ल्याचे नेतृत्व करत मुघलांना मागे हटण्यास भाग पाडले.

Chand Bibi

|

sakal

तीन मोठ्या शाह्यांची वज्रमूठ

मुघलांचा धोका ओळखून चांद बीबींनी विजापूर, गोवळकोंडा आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या तीन शाह्यांना एकत्र आणून सैन्याची महाआघाडी उभारली.

Chand Bibi

|

sakal

विश्वासघात

दरबारातील फितूर मंत्र्यांनी कटकारस्थान केले अन् १५९९ मध्ये अकबराचा मुलगा शहजादा दानियाल याने पुन्हा किल्ल्याला वेढा घातला.

Chand Bibi

|

sakal

बचाव अन् तहाची बोलणी

किल्ल्यात अन्नधान्य संपू लागल्याने प्रजा व सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी चांद बीबींनी मुघलांशी काही अटींवर तहाची बोलणी सुरू केली.

Chand Bibi

|

sakal

अफवा अन् स्वतःच्याच सैन्याने घेतला जीव!

'राणीने मुघलांशी हातमिळवणी केली' अशी खोटी अफवा जिता खान या सेवकाने पसरवली; त्यामुळे भडकलेल्या सैनिकांनी चवताळून स्वतःच्याच पराक्रमी राणीची हत्या केली.

Chand Bibi

|

sakal

राणीच्या मृत्यूनंतर किल्ल्यावर ताबा

चांद बीबींच्या बलिदानानंतर मुघल सैन्याने नगरच्या किल्ल्यावर ताबा मिळवला.

Chand Bibi

|

sakal

किल्ल्याला भेट

अहमदनगर (अहिल्यानगर) किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्सच्या प्रशासनाखाली आहे तरी इतिहास प्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी अन् पर्यटक आवश्यक परवानगी घेऊन किल्ल्याला भेट देऊ शकतात.

Chand Bibi

|

sakal

झलकारी बाई नक्की कोण होती? १८५७ ला इंग्रजांना जिने दिला होता चकवा!

Jhalkari Bai

|

sakal 

आणखी वाचा