Mansi Khambe
इस्लाम धर्मात धार्मिक श्रद्धेचा आणि नम्रतेचा भाग म्हणून अनेक महिला बुरखा किंवा हिजाब घालतात. बुरखा घालणे हे इस्लाम धर्मात धार्मिकतेचे प्रतीक मानले जाते.
महिलांना बुरखा घालायचा की नाही, हा त्यांचा स्वतःचा निर्णय असतो. अनेक महिला स्वतःच्या इच्छेने बुरखा घालतात, तर काहींना तो घालणे बंधनकारक वाटत नाही.
मात्र असे काही देश आहेत ज्यामध्ये महिलांना बुरखा किंवा हिजाब घालण्यास पूर्णपणे बंदी आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते देश.
युरोपीय देशांमध्ये बुरख्यावरील पहिली बंदी सुरू झाली. येथे बुरखा परिधान करणाऱ्या महिलांना १५० युरो तर महिलांना बुरखा घालण्यास भाग पडणाऱ्याला ३०,००० युरो दंड आकारला जातो.
कझाकस्तान सरकारने महिलांना बुरखा किंवा हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी हा आदेश जारी केला आहे.
त्याचबरोबर अल्जेरिया, ट्युनिशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, चाड या मुस्लिम देशातही महिलांना बुरखा घालण्याबाबतही कडक कायदा आहे.
या व्यतिरिक्त, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, जर्मनी आणि इटली हे देखील अशा देशांमध्ये आहेत जिथे बुरखा घालण्यास बंदी आहे.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने, चेहरा पूर्णपणे झाकल्याने ओळख पटवणे अधिक कठीण होते, त्यामुळे सुरक्षेसाठी धोका निर्माण होतो, असे काही देशांना वाटते. यामुळे बुरखा घालण्याबाबत बंदी केली आहे.
तसेच भारताचा विचार केला तर, येथे बुरखा घालण्यावर कोणतेही बंधन नाही.