धावपळीच्या सकाळसाठी पटकन अन् पौष्टिक 'अंड्याचा' हा पदार्थ नक्की बनवा!

Aarti Badade

सकाळचा हेल्दी नाश्ता

अंड्याचा चिला' हा धावपळीच्या सकाळसाठी एक जलद आणि निरोगी नाश्ता आहे.

Egg chilla recipe | Sakal

प्रथिनेयुक्त आणि चविष्ट

अंड्याचा चिला फेटलेली अंडी, मसाले आणि भाज्या वापरून बनवला जातो, जो प्रथिनेयुक्त आणि अतिशय चविष्ट असतो.

Egg chilla recipe | Sakal

अंड्याचा चिला बनवण्यासाठी साहित्य

२ अंडी, २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, १ टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सिमला मिरची, १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

Egg chilla recipe | Sakal

साहित्य

१ बारीक चिरलेली हिरवी मिरची, ¼ टीस्पून लाल मिरची पावडर, ¼ टीस्पून हळद पावडर, चवीनुसार मीठ, १ टीस्पून तेल किंवा तूप (स्वयंपाकासाठी).

Egg chilla recipe | Sakal

अंड्याचा चिला

एका भांड्यात अंडी फोडा. त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.

Egg chilla recipe | Sakal

पॅन गरम करा

एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि त्यावर थोडे तेल किंवा तूप लावून ग्रीस करा.

Egg chilla recipe | Sakal

मिश्रण ओता

अंड्याचे मिश्रण पॅनवर ओता आणि ते पॅनकेकसारखे हलक्या हाताने पसरा.

Egg chilla recipe | Sakal

दोन्ही बाजूंनी शिजवा

मध्यम आचेवर २-३ मिनिटे बेस सेट होईपर्यंत शिजवा. नंतर उलटा करून दुसरी बाजू १-२ मिनिटे शिजवा.

Egg chilla recipe | Sakal

अंड्याचा चिला गरमागरम सर्व्ह करा

पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचप किंवा बटर लावलेल्या टोस्टसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Egg chilla recipe | Sala;

तुमच्या आवडीच्या भाज्यांसह अंड्याचा चिला

तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या वापरून हा अंड्याचा चिला अधिक चविष्ट बनवू शकता!

Egg chilla recipe | Sakal

पावसाळ्यात हे एक फळ चुकूनही खाऊ नका!

Avoid Watermelon in Rainy Season | Sakal
येथे क्लिक करा