पुजा बोनकिले
यंदा पावसाळा चांगलाच सुरू झाला आहे.
पावसाळ्यात अनेक लोक चांगला आणि वर्षभर टिकेल असा रेनकोट खेरदी करण्याचा विचार करतात.
तुम्हीही रेनकोट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
रेनकोट वॉटरप्रुफ फॅबरिकचा असावा. नायलॉन किंवा पॉलिस्टरसारखे फॅब्रिक उत्तम ठरतात.
रेनकोट जास्त घट्ट किंवा खुप ढिला नसावा.
चांगल्या प्रतीचा रेनकोट जास्त काळ टिकतो. त्यामुळे खरेदी करताना काळजी घ्यावी.
काही रेनकोटमध्ये पॉकेट्स आणि हुड दिलेले असतात. ते असतील तर खरेदी करु शकता.
हलके आणि सहज दुमडता येणारे रेनकोट निवडा.
स्टायलिश आणि आवडीच्या रंगांसह रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या असलेले रेनकोट खेरदी करावे