थंडीतही ओठ राहतील गुलाबासारखे मऊ; महागड्या क्रीम्सला करा बाय-बाय!

Aarti Badade

ओठांचा कोरडेपणा का वाढतो?

थंड हवामानामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे ओठ कोरडे, फाटलेले आणि संवेदनशील बनतात. यावर घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Winter Lip Care

|

Sakal

नारळ तेलाची जादू

नारळ तेलामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. दिवसातून २ ते ३ वेळा ओठांवर थोडे नारळ तेल लावल्यास ओठांना खोलवर पोषण मिळते आणि ओलावा टिकून राहतो.

Winter Lip Care

|

Sakal

साजूक तुपाचा पारंपरिक उपाय

ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तूप हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक उपाय आहे. रात्री झोपताना ओठांना थोडे तूप लावल्याने ओठ नैसर्गिकरीत्या मऊ होतात.

Winter Lip Care

|

Sakal

घरगुती नॅचरल स्क्रब

एक चमचा मध आणि एक चमचा साखर एकत्र करून नैसर्गिक स्क्रब तयार करा. हे ओठांवर हलक्या हाताने चोळल्यास मृत त्वचा (Dead Skin) निघून जाते आणि ओठ गुलाबी दिसू लागतात.

Winter Lip Care

|

sakal

कोरफड जेलचा थंडावा

कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. हे जेल ओठांवरील जळजळ कमी करते आणि फाटलेल्या ओठांच्या जखमा भरून काढण्यास मदत करते.

Winter Lip Care

|

Sakal

काकडीचा तुकडा

काकडीचा एक पातळ तुकडा घेऊन तो ओठांवर काही वेळ चोळा. काकडीतील नैसर्गिक थंडावा आणि पाण्याचे प्रमाण ओठांना ताजेतवाने आणि मऊ बनवते.

Winter Lip Care

|

Sakal

हायड्रेशन विसरू नका!

केवळ बाह्य उपचार पुरेसे नाहीत; दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्या. शरीर आतून हायड्रेटेड असेल, तरच ओठ फाटण्यापासून वाचू शकतात.

Winter Lip Care

|

Sakal

ओठ चावण्याची सवय सोडा!

ओठ कोरडे झाल्यावर ते वारंवार जिभेने ओले करणे किंवा दातांनी ओठांची त्वचा काढणे टाळा. यामुळे ओठ अधिक फाटतात. त्याऐवजी नैसर्गिक लिप बामचा वापर करा.

Winter Lip Care

|

Sakal

टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोन होतो का? सत्य जाणून घ्या!

Tomato & Kidney Stone Facts

|

Sakal

येथे क्लिक करा